मशिदींवरील भोंगे काढल्यास विरोध करणार, रामदास आठवलेंचा राज यांना इशारा
नागपूर : महाराष्ट्रात भोंग्यावरुन राजकारण तापले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. ठाण्यात पार पडलेल्या उत्तरसभेत त्यांनी ३ मे ही शेवटची तारिख मशिदींवरील भोंगे काढण्यास असल्याचे सांगितले. मात्र यावरुन राज्यात टीका-टिप्पणी होत आहे. यात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. नवरात्र आणि इतर उत्सवाप्रसंगी भोंगे लावल्यास चालते.
मशिदींवरील भोंगे काढण्याचे राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. राज ठाकरे यांना जर मंदिरांवर भोंगे लावायचे असतील तर ते लावू शकतात. मात्र मशिदींवरील भोंगे काढल्यास त्याला रिपब्लिकन पक्ष विरोध करेल, असा इशारा आठवले यांनी दिला. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात भोंग्यावरुन राजकारण होऊ नये. अनेक वर्षांपासून मशिदींवर भोंगे आहेत. भोंग्यांचे काय करायचे यावर मुस्लिम समाज विचार करु शकतो. मात्र मला वाटते की एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माचा आदर करायला हवा, असे रामदास आठवले म्हणाले.


0 Comments