google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नी व मुलाला पोलिसांकडून अटक

Breaking News

पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नी व मुलाला पोलिसांकडून अटक

 पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नी व मुलाला पोलिसांकडून अटक

पुणे :पती चारित्र्यावर संशय घेऊन भांडत असल्याच्या रागातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला.


त्यानंतर कोणाला संशय येऊ नये आणि पतीने आत्महत्या  केल्याचे भासवण्यासाठी पतीचा मृतदेह घराजवळील मंदिरात गळफास लावून लटकवला. मात्र शवविच्छेदन अहवालात मारहाण करुन आणि गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी  तपास करुन आरोपी पत्नी आणि अल्पवयीन मुलाला अटक  केली आहे. 


प्रकाश किसन जाधव  (वय-42 रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, सुंधा मातानगर, कात्रज-Katraj) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी शालन प्रकाश जाधव  (वय-40) हिला अटक करुन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार 1 एप्रील रोजी पहाटेच्या सुमारास कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ घडला होता.


मृत प्रकाश जाधव याने गळफास घेतला नसून गळा दाबून तसेच त्याच्या डोक्याच्या अंतर्गत भागात झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल ससून हॉस्पिटलने  भारती विद्यापीठ पोलिसांना दिला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सरु करुन कुटुंबातील सदस्यांकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी कोणावरच संशय व्यक्त केला नाही.


दरम्यान, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे  धनाजी धोत्रे व शिवदत्त गायकवाड यांना माहिती मिळाली की, घटनेच्या दिवशी मृत व्यक्ती आणि पत्नीमध्ये भांडण होऊन प्रकाशला मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पत्नी आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान मुलाने वडिल आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन अनैतिक संबंधावरुन  आई व माझ्यासोबत वाद झाले होते. 


त्यावेळी रागाच्या भरात वडिलांचा दोन वेळा गळा दाबून त्याचे डोके भिंतीवर आपटलं. यामध्ये ते बेशुद्ध पडल्यानंतर आईच्या मदतीने मंदिरात दोरीच्या सहाय्याने लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. मुलाच्या आईने देखील मुलाने सांगितल्याप्रमाणे माहिती देऊन गुन्ह्याची कबुली दिली.


Post a Comment

0 Comments