google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 होय मी ‘ते’ केले; अखेर गुणरत्न सदावर्ते यांची कोर्टात मोठी कबुली

Breaking News

होय मी ‘ते’ केले; अखेर गुणरत्न सदावर्ते यांची कोर्टात मोठी कबुली

 होय मी ‘ते’ केले; अखेर गुणरत्न सदावर्ते यांची कोर्टात मोठी कबुली


मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते  यांना काल गिरगाव कोर्टात  हजर केले होते. यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर गिरगाव कोर्टाने   गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. अशातच एक महत्वाची बातमी आहे.


सदावर्ते यांनी स्वत:हूनच न्यायालयात एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतल्याचे कबूल केले आहे. ही रक्कम 1 कोटी 44 लाख रुपये असल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केला आहे. सदावर्ते यांनी म्हटले की, होय, मी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200 ते 300 रुपये घेतले. मात्र हे पैसे एसटी कर्मचार्‍यांनी आपल्या मर्जीने मला दिलेले आहेत. एसटी विलिनीकरण्याच्या याचिकेसाठी हे पैसे मी घेतले होते. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी कोर्टाला सांगावे.


आंदोलक एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेत त्यातून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होत असतानाच सदावर्ते यांच्या घरात पोलिसांना पैसे मोजण्याचे मशीन सापडल्याने मोठी खळबळ माजली होती. कोर्टात युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी म्हटलं, सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात रिफरन्स म्हणुन वाचून दाखवला.

Post a Comment

0 Comments