google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : अन्यथा बीडीओ-ग्रामसेवकांवर कडक कारवाई करेन ; सिईओ स्वामींनी का दिला इशारा

Breaking News

सोलापूर : अन्यथा बीडीओ-ग्रामसेवकांवर कडक कारवाई करेन ; सिईओ स्वामींनी का दिला इशारा

 सोलापूर : अन्यथा बीडीओ-ग्रामसेवकांवर कडक कारवाई करेन ; सिईओ स्वामींनी का दिला इशारा

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा तसेच पाणी व स्वच्छता विभागाची सामूहिक बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शिवरत्न सभागृहात घेतली. 

या बैठकीला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोळी, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, उप अभियंता सुनील  कटकधोंड, यासह दोन्ही विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी सीईओ स्वामी यांनी ग्रामीण भागातील नळजोडणी वरून उपस्थित अधिकाऱ्यांना चांगले काम करण्याच्या सूचना केल्या. राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत 


ते स्वतः आढावा घेणार आहेत. त्यावेळी कोणतीही अडचण होता कामा नये, सोलापूर जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे जे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक या अभियानात काम करत नाहीत त्यांच्यावर मी स्वतः कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला...

Post a Comment

0 Comments