शिक्षकांचं संतापजनक कृत्य शिक्षकाने तब्बल 7 मुलींवर अत्याचार केला.
जिवती - कोरोना काळापासून राज्यात सर्वत्र शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती, गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यात आल्या.
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी कंटाळले होते.
शाळेचे वर्ग सुरू झाले होते, विद्यार्थी सुद्धा शाळेत पूर्ण संख्येने येऊ लागले मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडावर असलेल्या जिवती तालुक्यात एका शिक्षकाच्या डोक्यात काही औरच होते.
तालुक्यात पहिली ते पाचवी पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 49 वर्षीय शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड याने काही अल्पवयीन मुलींना पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून विकृतीपणाचा कळस घातला, त्या शिक्षकाने शिक्षकी पेशेला लाजवेल असे कृत्य केले.
अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करीत त्यांच्यावर अत्याचार केले, संतापजनक म्हणजे मागील वर्षभरापासून त्या शिक्षकाने तब्बल 7 मुलींवर अत्याचार केला.
अत्याचार ग्रस्त मुलीने या अत्याचारावर आवाज उचलत आपल्या आईला ही बाब सांगितली, क्षणाचाही विलंब न करता आईने शिक्षकाविरुद्ध तक्रार जिवती पोलीस ठाण्यात दिली.
तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांनी तात्काळ कारवाई केली.
जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अपराध क्र.35/2022दि 18/04/2022, 354 (अ),376,(A) 376(2) (N) भादवी सह. 4.6,8,12 बाललैंगिक अपराध पासून संरक्षण 2012 पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी शिक्षकाने सात विद्यार्थिनींसोबत असा घृणास्पद प्रकार केला असून, मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करीत आहे.
काही वर्षांपूर्वी बल्लारपूर तालुक्यात आदर्श शिक्षकाला 6 मुलीवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली होती.


0 Comments