google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळ! मंगळवेढ्यात आर्केस्ट्रामधील गाण्यावरून दोन गटात हाणामारी; अँट्रॉसिटी दाखल

Breaking News

खळबळ! मंगळवेढ्यात आर्केस्ट्रामधील गाण्यावरून दोन गटात हाणामारी; अँट्रॉसिटी दाखल

 खळबळ! मंगळवेढ्यात आर्केस्ट्रामधील गाण्यावरून दोन गटात हाणामारी; अँट्रॉसिटी दाखल 

यात्रेत आर्केस्ट्रामधील गाण्यावर नाचण्याच्या वादातून पाचजणांनी दोघांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केली. रात्री साडेनऊच्या सुमारास आंधळगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी त्या पाचजणांविरुद्ध येथील पोलिसांत अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. नीलेश लेंडवे, विपुल लेंडवे, सागर लेंडवे, राहुल गुजले (सर्व रा.माळवाडी, लेंडवेचिंचाळे), योगेश तानगावडे (रा . गणेशवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.


संशयितांनी फिर्यादी राहुल शशिकांत शिंदे , त्याचा मित्र विकास क्षीरसागर (रा . आंधळगाव ) यांना मारहाण केली. तसेच सागर व योगेश यांनी फिर्यादीच्या घरासमोर जाऊन आई व बहिणीला शिवीगाळ केली. सागर याने दमदाटी केली असे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

Post a Comment

0 Comments