google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 करडी नजर! पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी नागरिकांना केले 'हे' महत्त्वाचे आवाहन

Breaking News

करडी नजर! पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी नागरिकांना केले 'हे' महत्त्वाचे आवाहन

 करडी नजर! पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी नागरिकांना केले 'हे' महत्त्वाचे आवाहन 

सध्या अनेक ठिकाणी अफवांचे पिक येत असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकणाऱ्या

अफवा काहीजण पसरवित असून या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी केले आहे.


माने म्हणाले, प्रत्येकाने आपण आदर्श नागरिकांची कर्तव्ये बजावण्यासाठी पुढे आले पाहिजे. कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो अथवा मजकूर सोशल मिडीयावर पोस्ट करू नये.

सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वानी सहकार्य केले पाहिजे. कोणत्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होवू नये

सध्या पोलिसांची अशा प्रकारच्या कृत्यावर करडी नजर असून संबंधित कृत्ये करताना कोणी आढळून आले तर त्यांचेविरूध्द कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments