पंतप्रधान मोदींनी स्विकारला पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. मंगेशकर कुटुंबियांनी मोदींचे यावेळी आभार मानले. लतादीदींचं व्यक्तिमत्त्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आपला देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असतानाच दीदी आपल्याला सोडून गेल्या.
त्यांनी भारताला आवाज दिला. त्या खऱ्या अर्थाने भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वरसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांची मुक्तकंठाने स्तुती केली.


0 Comments