google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 २ रुपयांची पेप्सी बनली ७ मुलांच्या मृत्यूचे कारण

Breaking News

२ रुपयांची पेप्सी बनली ७ मुलांच्या मृत्यूचे कारण

२ रुपयांची पेप्सी बनली ७ मुलांच्या मृत्यूचे कारण

राजस्थानच्या सरूपगंजजवळील फुलाबाई खेडा येथे 7 मुलांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. ब्लॉक, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय वैद्यकीय पथके फुलाबाई खेडा येथे झालेल्या या बालकांच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. गुरुवारी आणखी दोन मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सकाळच्या वेळी प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकले जाणारे शीतपेय (पेप्सी) चे सेवन केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे मुलांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. याबद्दल डॉ. रामसिंग यादव म्हणाले की, शीतपेय आणि द्रवपदार्थ हेच प्रथमतः मृत्यूचे कारण मानले जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने गावातील काही दुकानांमधून या पेप्सीचे नमुने घेतले असून, इतर कोणत्याही बालकाला याचा फटका बसू नये म्हणून त्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. बुधवारी एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वैद्यकीय विभाग आणि पिंडवाडा उपविभागीय अधिकारी हसमुख कुमार यांनी संपूर्ण गावात घरोघरी जाऊन पाहणी करून आजारी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

Post a Comment

0 Comments