चुुुलतीला पुतण्याने फसवले...ज्यूसमधे गुंगीचे औषध टाकून केले अत्याचार...
आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मग चौघांनी केले अत्याचार
पहिल्या दिवशी पुतण्याने ज्यूस मध्ये काही तरी टाकून चुलती सोबत दुष्कर्म करुन व्हिडिओ बनवला तर, नग्न फोटोही काढले. दुसऱ्या दिवशी एकाने पीडितेला फोन करुन ‘तो’ अश्लिल व्हिडिओ माझ्याकडे असून माझ्या सोबत नाही आली तर व्हिडिओ शेअर करील म्हणून दुचाकीवर घेऊन जावून पुन्हा तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून उपाधीक्षक संतोष वाळके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. सामुहिक बलात्काराची घटना उघडकीस येताच बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील बेलुरा येथील २४ वर्षीय महिला पतीसह पुणे येथे राहाते. दारुच्या नशेत पतीने मारल्यामुळे ती ४ एप्रिलला माहेरी निघून आली. एकटीला पाहून आईने परत जाण्यास सांगितले, परंतु राग असल्याने पुण्याला जाण्याऐवजी मी बीड येथे बहीणीकडे काही दिवस राहिले. यानंतर ११ एप्रिल पुन्हा पुणे येथे ट्रॅव्हल्सने जाताना मला नात्याने चुलत पुतण्या असलेल्या अजय याने फोन करून काकांनी तुम्हाला घेऊन येण्यासाठी मला सांगितले आहे. सध्या मी अहमदनगर येथे आहे. तुम्ही नगरला चांदणी चौकात उतरा असे म्हणाला. मी चौकात उतरले असता अजय दुचाकीवर आला. रात्रीचे अडीच वाजत असल्याने आता दुचाकीवर जाणे योग्य नाही म्हणून लॉजवर थांबु व सकाळी उठून जाऊ असा म्हणाला. लॉजवर गेल्यानंतर मला ज्यूस पिण्यासाठी दिलं. त्यानंतर मला गुंगी आल्यानंतर अजय याने माझे कपडे काढले व दुष्कर्म केला. त्याचा व्हिडिओ बनवला व नग्न अवस्थेतील फोटो काढले. काका घरी नाहीत साईटवर गेले म्हणून नंतर जाऊ म्हणून मला परत जीपमध्ये बसवून बीडला पाठवलं. मी बीडला बहीणीकडे गेले. दुसऱ्याच दिवशी बेलुरा ( ता. बीड ) येथील दत्ता याचा फोन आला. त्याने अजय आणि तुमचा अश्लील व्हिडिओ व फोटो माझ्याकडे असल्याचे सांगून व्हायरल करण्याची धमकी देत माझ्या सोबत यावं लागेल म्हणून ब्लॅकमेल करत दुचाकीवर बसवून बेलुरा गावाच्या दिशेने घेऊन गेला. काठवटी फाट्याजवळ एका ओढ्यात दुचाकी उभी केली. यानंतर पाठी मागून एक दुचाकी आली त्यावर दोघेजण आले. मला ओढ्याच्या बाजुला असलेल्या शेतात नेऊन दोघांनी हातपाय धरुन बारी बारीने एक-एकाने इच्छे विरुद्ध दुष्कर्म केले. पहाटे पर्यंत तिघांनी अत्याचार केले. याची माहिती आई व पतीला दिली. त्यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली. अशी फिर्याद पिडीतेने दिली असून त्यावरुन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी अजय , दत्ता , परमेश्वर , प्रकाश या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments