google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा.शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला . मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटील..

Breaking News

सांगोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा.शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला . मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटील..

सांगोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा.शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा  तीव्र निषेध केला .


 मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटील.. 

अन्यथा अशा प्रवृत्तींना रस्त्यावर उतरून धडा शिकवू ; मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा

सांगोला : तालुका प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या नावाखाली काही जातीय व धार्मिक दंगली घडविण्याचा डाव असणाऱ्या मंडळींनी शुक्रवार दि . 08 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील घरावर भ्याड हल्ला केला .


या हल्ल्यामागे ज्यांचे हात आहेत किंवा जी शक्ती अप्रत्यक्षपणे काम करते , अशांना राज्यातील तपास यंत्रणांनी तात्काळ चौकशी करून ताब्यात घ्यावे . अन्यथा अशा प्रवृत्तींना राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून धड़ाशिकवेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा . 


आम . दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला . शनिवार दि 9 एप्रिल रोजी शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केला . सांगोला तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करून आपला निषेध नोंदवला .


 यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील बोलत होते . यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमालाताईगायकवाड , तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे , शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील , शिवाजीनाना बनकर , अनिल खडतरे , सोमनाथ लोखंडे , आलमगीर मुल्ला , चंद्रकांत शिंदे , अनिल खटकाळे , अमोल सुरवसे ,


 योगेश खटकाळे , चंदन होनराव , विजय पवार , अंगद जाधव , शिवाजी इंगोले , राज मिसाळ , बापूसाहेब ठोकळे बाळासाहेब बनसोडे प्रवीण पाटील कैलास खबाले उमेश गायकवाड किरण पवार शिवानंद पाटील नारायण माळी महादेव पवार बिरा गेजगे सूर्यकांत आधाटे गिरीश पाटील बाबासाहेब करांडे अमर पाटील नागेशलोखंडे शिवाजीराव कोळेकर असलम पटेल ज्ञानेश्वर शिंदे 


अजित गोडसे भूषण बागल संभाजी हरिहर रवी चौगुले देवा लोखंडे सोमनाथ कोळी पटेल धनंजय पाटील राहुलदादा क्षीरसागर सचिन शिनगरे विनोद रणदिवे उपसरपंच राहुल ढोले विजय काशीद जितेंद्र साळुंखे व माजी नगरसेवक अरुण काळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . पुढे बोलताना मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले , राज्यात शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखालीअस्तित्वात आलेले


 महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात अपयश आल्याने हताश झालेल्या मानसिकतेतून शरदचंद्रजी पवार यांना बदनाम करण्याचे कारस्थान नागपूरच्या रेशीम बागेतून सुरु आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लढवय्ये कार्यकर्ते आणि महा विकास आघाडीतील सर्व नेते मंडळी नागपूरच्या रेशीमबागेत सुरु असलेला कट नक्कीच उलथवून लावतील . आणि महाराष्ट्र राज्य अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडतील असा विश्वासही शेवटी


 मा . आम . दिपकआबा साळुंखे पाटीलयांनी व्यक्त केला . यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमलाताई गायकवाड , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे चंद्रकांत शिंदे संभाजी हरिहर शिवानंद पाटील बापूसाहेब ठोकळे बाळासाहेब बनसोडे आदींनी मनोगत व्यक्त केले शरदचंद्रजी पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला .

Post a Comment

0 Comments