Breaking News

' तुझं माझं जगणं ' या मराठी युट्युब वेबसिरीजचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न*...

 ' तुझं माझं जगणं ' या मराठी युट्युब वेबसिरीजचा पोस्टर अनावरण सोहळा  संपन्न*...

सांगोला- *प्रेमकुमार वाघमारे यांच्या PK Production निर्मित तुझं माझं जगणं*  या युट्युब वेबसिरीजचे पोस्टर अनावरण आज दुपारी एक वाजता सांगोला येथील हॉटेल हॅप्पी पार्क मध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी अस्तित्व संस्थेचे शहाजी गडहिरे, सांगोला नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका विजयाताई बनसोडे, डॉ. सागर भजनावळे, पत्रकार रवीप्रकाश साबळे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुझं माझं जगण या वेबसिरीज च्या पोस्टरचे अनावरण अतिशय थाटामाटात करण्यात आले. 


या यावेळी या वेबसीरीज मध्ये काम करणारे प्रमुख कलाकार पांडुरंग पाटील, जितेश कोळी, सानिका दिवाण, आरती बेंगलोरकर, रविंद्र कांबळे, ॲड. महादेव कांबळे, ज्ञानेश्वर भजनावळे, वैभव मुखरे, सिताराम खरात, दत्तात्रय वाघमोडे, श्री कांबळे, मोहन साळुंखे तसेच आरोह स्टुडिओचे सुभाष जगधने वाणीचिंचाळे गावचे सरपंच जितेंद्र गडहिरे, बनसोडे पेंटर तसेच याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 ग्रामीण भागामध्ये यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून *दर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता तुझं माझं जगणं ही वेबसिरीज आपल्याला पाहायला मिळणार आहे* ग्रामीण भागामध्ये वेबसिरिज च्या माध्यमातून प्रेमकुमार वाघमारे यांनी उचललेले पाऊल हे अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसाचे आहे. त्यांनी वेबसिरीजच्या माध्यमातून तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करावे व कलेच्या प्रांतामध्ये आपले नाव कमवावे अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.


 यावेळी ' तुझं माझं जगणं ' वेबसिरीज मधील कलाकार पांडुरंग पाटील, सानिका दिवान, संगीतकार योगेश गायकवाड, ॲड. महादेव कांबळे, रविंद्र कांबळे, शुभम वास्ते यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महादेव कांबळे यांनी केले तर आभार संतोष होवाळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments