सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई
सोलापूर जिल्ह्यातील सरकारी नोकरदारांना एक एप्रिलपासून हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. काही दिवस प्रशासनाकडून याबाबत जनप्रबोधन करण्यात यावा, त्यानंतर सक्ती करून जे कर्मचारी हेल्मेट वापर नाहीत , त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना आरटीओ विभागाने केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सक्ती सवय कार्यालयात हेल्मेटची अधिकारी दुचाकी अधिकारी न्यायालयाच्या वापरणे कार्यालयात जाईल करण्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे याबाबत लवकरच आदेश काढणार आहेत. महसूल कर्मचारी, जिल्हा परिषदेतील कर्मचारी, तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाही हेल्मेटर्च सक्ती राहणार आहे. कर्मचाऱ्यांना सवय झाल्यानंतर शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी दुचाकी वाहन वापरणारे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे .याबाबत सरकारी कार्यालयात दोन आठवडे प्रबोधन केले जाईल, त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.


0 Comments