google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने दिली गेल्या 6 महिन्यातील अत्यंत महत्वाची बातमी

Breaking News

प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने दिली गेल्या 6 महिन्यातील अत्यंत महत्वाची बातमी

 प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने दिली गेल्या 6 महिन्यातील अत्यंत महत्वाची बातमी

मुंबई : एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक खिळखिळी झाली होती. खाजगी वाहतूक व्यवस्थेची मनमानी चालू होती. अशातच कोर्टाने एसटी कर्मचार्यांना कामावर परतायला सांगितले होते. त्यामुळे आता एसटी संपामधील सहभागी असणारे जवळपास निम्मे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तसेच महामंडळानेही त्यांना कुठल्याही कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये न अडकवता तातडीने रुजू करून घेण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.


सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्व आगारांत मिळून 16 हजारांहून अधिक फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या पाच महिन्यांपासून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तालुका आणि ग्रामीण भागांत संपाची झळ सर्वाधिक बसत असल्याने आता महामंडळाने या मार्गांवर प्रवासीसेवा सुरू करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सहा महिन्यांनंतर एसटी पूर्वपदावर येण्यास सज्ज झाली आहे.


एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारअखेर राज्यात विविध मार्गांवर 16 हजार फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या. या फेऱ्यांच्या माध्यमातून रोज सुमारे 13 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत आहे. ज्यावेळी संप सुरु झाला तेव्हा जवळपास राज्यातील २५० आगार सुरू होते, मात्र तिथे कमर्चारी नसल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती. परिणामी एसटी फेऱ्या धावत नव्हत्या. आता कर्मचारी पुन्हा कामावर आल्याने राज्यातील एसटी वाहतूकदेखील सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments