लग्न व्हावं म्हणून , एका मांत्रिकाच्या
सांगण्यावरून होळीच्या दिवशी दिला जाणार होता सात वर्षीय निष्पाप मुलीचा बळी…
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे मोठी घटना टळली आहे. याठिकाणी नरबळी देण्यासाठी एका सात वर्षांच्या निष्पाप मुलीचे अपहरण करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी वेळीच या मुलीला परत मिळवून दिले.
याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक देखील केली आहे. हे प्रकरण नोएडातील सेक्टर ६३ पोलीस स्टेशनमधील छिजारसी गावातील आहे.अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी आजूबाजूला लावलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि मुलीपर्यंत पोहोचले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. चौकशीत मुख्य आरोपीने आपले लग्न होत नसल्याचे पोलिसांना सांगितले. मांत्रिकाच्या सांगण्यावरून बळी देण्यासाठी मुलीचे अपहरण करण्यात आले.
होळीच्या दिवशी मुलीचा बळी द्यायचा होता या प्रकरणी डीसीपी सेंट्रल गौतम बुद्ध नगर हरिश्चंद्र यांनी सांगितले की, मुख्य आरोपी सोनू, ज्याचे वय सुमारे 25 वर्षे आहे. लग्न होत नसल्याने तो नाराज होता. त्यानंतर त्यांचा एक नातेवाईक होता जो मांत्रिक म्हणून काम करत असे. या विषयावर त्याच्याशी संवाद साधला असता मांत्रिकाने त्याला होळीच्या दिवशी मानवी बळी दिल्यावर लवकरच तुझं लग्न होईल, असा सल्ला दिला.
पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली त्यानंतर आरोपी सोनूने शेजारी राहणाऱ्या ७ वर्षीय मुलीचे बळी देण्यासाठी अपहरण केले आणि त्यानंतर मुलीला बागपत येथे बहिणीच्या घरी नेले. जेणेकरून होळीच्या दिवशी बालिकेचा बळी देता येईल. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे दोन आरोपींना अटक केली. दरम्यान हे प्रकरण सोडवणाऱ्या टीमला आयुक्तांच्या हस्ते 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

0 Comments