Breaking News

उध्वस्त डाळींब बागांसाठी आता थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना फोन आंदोलन...प्रफुल्ल कदम यांचा राज्य व केंद्र शासनाला इशारा

 उध्वस्त डाळींब बागांसाठी आता थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना फोन आंदोलन...प्रफुल्ल कदम यांचा राज्य व केंद्र शासनाला इशारा

   उध्वस्त डाळींब बागांसाठी आता थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना फोन आंदोलन...प्रफुल्ल कदम यांचा राज्य व केंद्र शासनाला इशारा   एकरी किमान एक लाख रुपये नुकसान भरपाईसह महत्वपूर्ण सहा मागण्या शासनाला सादर.     

हजारो शेतकरी होणार आंदोलनात सहभागी


 सोलापूर -डाळिंबातील पिन होल बोरर या किडीमुळे  दुष्काळी भागातील बहुतांशी डाळींबाच्या बागा नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये  शेतकऱ्यांच्या व्यथ्यांकडे राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 


आणि या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली सहा मागण्या सादर केल्या असून या मागण्या 15 मार्च पर्यन्त मान्य केल्या नाही तर उध्वस्त झालेले हजारो शेतकरी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयावर फोन आंदोलन करणार असल्याचा इशारा किसान आर्मीच्यावतीने देण्यात आला आहे.


         डाळींबातील पिन होल बोरर या किडीमुळे उध्वस्त झालेल्या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना एकरी किमान एक लाख रुपये म्हणजेच हेक्टरी किमान अडीच लाख रुपये तत्काळ आर्थिक मदत करावी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना परत नव्याने डाळींब लागवड करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर अभ्यासपूर्ण नवीन योजना सुरू करून शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम करावे. 


             उध्वस्त झालेल्या डाळींब बागांवरील सर्व कर्जे विना अटी व शर्थी शिवाय तत्काळ पूर्णपणे माफ करावे.उध्वस्त झालेल्या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची सर्व प्रकारची शैक्षणिक फी तत्काळ माफ करावी.पीक विमा योजनेमध्ये सदर रोगकिडी मुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करण्यात यावा.वीज बिलाबाबत व वीज पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांवर होत असणाऱ्या अन्याय तत्काळ दूर करण्यात यावा. यासाठी शासनाने तत्काळ कृती दल स्थापन करावा.


या सहा मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments