सांगोला नगरपरिषदे मार्फत विशेष कर वसुली मोहीम ; थकबाकीरांच्या मालमत्ता सील होणार ,
पाणीपुरवठा होणार खंडित ; मुख्याधिकारी कैलास केंद्रे
सांगोला / तालुका प्रतिनिधी ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ वर्षांपासून सांगोला नगरपरिषदेने मालमत्ता , पाणीपट्टी , इमारत भाडे , खुल्या जागा भाडे वसुली साठी कठोर भूमिका घेतली नाही. परिणामी खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढली आहे
वारंवार सूचना देऊन , आवाहन करूनही त्याची दखल न घेणाऱ्या नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता धारक , नळ धारक थकबाकीदार यापैकी वाणिज्य वापरचे गाळे थेट सील केले जाणार असून रहिवासी मालमत्ते मधील नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याची माहिती सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री . कैलास केंद्रे साहेब यांनी दिली आहे .
नगरपरिषदेच्या कर विभागामार्फत वारंवार तोंडी सूचना देऊन , लेखी नोटीस देऊनही ३१ मार्च २०२१ अखेर पर्यंतची गाळा भाडे थकबाकी व चालू बाकी नगरपरिषदेकडे भरणा न केलेल्या सर्व मालमत्ता थेट सील करण्याची तसेच मागील थकबाकी असणाऱ्या पाणीपट्टी , घरपट्टी धारकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई सांगोला नगरपरिषदेमार्फत शुक्रवार दिनांक ०४/०३/२०२२ पासून सुरू केली जाणार आहे .
सदरची कारवाई मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक श्रीमती तृप्ती रसाळ , सह. मालमत्ता पर्यवेक्षक श्री . स्वप्नील हाके यांच्या पथकामार्फत केली जाणार असून या पथकात रमेश मोरे , शिवदास बनसोडे , सोमनाथ देशमुख , नितीन चव्हाण , लक्ष्मण चव्हाण इत्यादींचा समावेश आहे . सदर कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे समजून कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्याधिकारी केंद्रे यांनी यावेळी दिली आहे .

0 Comments