सांगोला तालुक्यातील किडेबिसरी येथे घेरडे कुटुंबीय गावातील शिवाजी घेरडे
यांची शेतजमीन वाट्याने का करतो म्हणत मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली...
त्यावेळी तिघांनी कुटुंबाला घरात घुसून तुम्ही शिवाजी घेरडे यांची जमीन वाट्याने का करता? असे म्हणत मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कमळाबाई घेरडे यांनी सोमवारी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून पोलिसांनी जितू उत्तम घेरडे, उत्तम नामदेव घेरडे, रणजित उत्तम घेरडे तिघेही राहणार किडेबिसरी तालुका सांगोला यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत.
फिर्यादी कमळाबाई घेरडे, पती सदाशिव आणि मुलगा दिलीप हे गावातील शिवाजी घेरडे यांची शेत जमीन वाट्याने करत होते. त्यांना घरात घुसून तिघांनी तुम्ही शिवाजी घेरडे यांची शेतजमीन वाट्याने का करता असे म्हणून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केले आहेत.

0 Comments