जुनोनी गावातील मुळ एस टी थांब्यापासून सर्व बसेसची येजा करणेबाबत , विद्यार्थ्याची गैरसोय होउ नये म्हणून कोंबडवाडी - सांगोला बस त्वरित चालू करणेबाबत .... ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे सरकार
सांगोला :जुनोनी गाव मिरज - पंढरपूर महामार्गावरील 7 ते 8 गावाची प्रमुख बाजारपेठ असून त्याठिकाणी लोकांची कायम आवक - जावक जास्त असते , तसेच नवीन महामार्ग गावाच्या बाहेरून गेला असून त्या महामार्गावर ये जा करणा - या बसेस बाहय मार्गावरूनच जातात . जुनोनी मुळ थांब्याजवळ 1 मिनीटाला 1 प्रवाशी असून त्यामुळे सर्व बसेस जुनोनीच्या मुळ थांब्यातूनच ये जा कराव्यात , तसेच कोंबडवाडी सांगोला ही बस विद्यार्थ्यासाठी खुप लाभदायक असून सकाळी कोंबडवाडी - कोळा - जुनोनी या भागातील किमान 150 इतके विद्यार्थी या बसने ये जा करतात . त्यामुळे शालेय विद्यार्थ्याची गैरसोय टाळण्यासाठी कोंबडवाडी - सांगोला ही निवासी बस सुरू करण्यात यावी .
चोकट:
*मा आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सूचनेनुसार मिरज पंढरपूर हायवे वरीलसर्व बसेस जुनोनी गावातील मूळ बसथांब्यावरूनच जाव्यात तसेच तसेच न जाणाऱ्या बसेससाठी सोमवार दि 14 /3 /2022 ते गुरुवार दि 17/3/2022 पर्यंत एक बसेस चा एक वाहक जुनोनी गावाजवळील दुभाजाक जवळ थांबवून मूळ थांब्यापासून घालवेल अश्या सूचना सांगोला तालुका एस. टी. आगारप्रमुख व्यवस्थापक मा मा शिकारे साहेब यांनी दिला.*
*कोणती एस. टी बस जुनोणीच्या मूळ थांब्यापासून जात नसेल तर उप आगार व्यवस्थापक मा देशमुख साहेबांशी (9970060404) संपर्क करावा*

0 Comments