Breaking News

शेकापचं ठरलं, सांगोल्यात १४ रोजी विराट मोर्चा

 शेकापचं ठरलं, सांगोल्यात १४ रोजी विराट मोर्चा

सांगोल्यात आंदोलन किंवा मोर्चा म्हटलं की, शेकाप हे समीकरण ठरलेलं असायचं. शेकापचे नेते स्व. गणपतराव देशमुख यांनी हजारोंच्या उपस्थितीत शेकडो मोर्चे काढले. त्यांच्या निधनानंतर शेकापतर्फे प्रथमच असा भव्य मोर्चा निघत आहे. या मोर्चाच्या निमित्ताने शेकाप आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.


सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. गणपतरावजी देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच तालुक्यात शेतकरी, कष्टकरी जनतेच्या न्यायहक्कासाठी भव्य मोर्चाचे आयोजन सोमवार, 14 मार्च 2022 रोजी करण्यात आल्याची माहिती तालुका चिटणीस भाई दादासाहेब बाबर यांनी दिली. मोर्चाची सुरुवात महात्मा फुले चौकातून सकाळी दहा वाजता होईल.


मागील दोन वर्षापासून सांगोला तालुक्यातील जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यासह अन्य लोकप्रतिनिधींचा शेतकरी, कष्टकरी जनातेविषयी असलेला कारभार मुळावर उठला आहे. आज शेतकऱ्यांसह सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. पण काही केल्या हे सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात मनमानी कारभार सुरू आहे.


आता तर शेतीपंपाच्या विजबिलाने बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे यासह अनेक समस्यांनी तालुका त्रस्त आहे. पण काही का असेना धुळवडी आधीच आता तालुक्यात शिमगा पहावयास मिळणार आहे. अशातच सांगोला पंचायत समितीची तब्बल 4 वर्षानंतर पहिल्यांदाच आमसभाही होत असल्याने ही आमसभाही वादळी होण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहे.


आबासाहेब असताना अशी वेळ तालुक्यावर कधीच आली नव्हती. अश्यातच त्यांच्या निधनाने सर्वचजण दुःखी असल्याने व कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे सर्वचजण भयभीत होते. पण आता प्रबळ विरोधक म्हणून त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागणार. त्यामुळेच भाई चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


हा मोर्चा प्रामुख्याने महावितरणने विजतोडणी तात्काळ थांबवावी, इथून पुढे मापक दराने वीज आकारणी करावी, पीकविम्याच्या जाचक अटी रद्द करून नुकसानग्रस्त डाळिंब बागांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासकीय मदत द्यावी, तालुक्यातील शेतीच्या पाणी योजनेच्या पाणीपट्टीच्या आकारणी प्रवाही पाणीपट्टीच्या दराने करावी,


सर्व प्रकारच्या शासकीय योजनेतील पेन्शन लाभार्थ्यांना दरमहा 1 तारखेलाच देण्यात यावी, चारा छावण्याची बिले तात्काळ अदा करण्यात यावीत यासह अन्य मागण्यासाठी हा भव्य मोर्चा 14 मार्च रोजी सांगोला तहसील कार्यालयावर आयोजित केलेला आहे.


आमसभाही वादळी होणार

आबासाहेब असताना सांगोला तालुक्यात दरमहा अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका व्हायच्या. आमसभाही जनतेच्या प्रश्नाने गाजायच्या. त्यामुळे अधिकारी वर्ग चांगली कामे करीत होते. त्यांच्यामध्ये एक प्रकारची भीतीही होती. पण आता सध्या मरगळ आलेली आहे. त्यातच 4 वर्षापासून आमसभाही झालेली नाही. त्यामुळे गुरुवार 17 मार्च रोजी होणारी आमसभा वादळी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments