google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संकेत काळे ठरला हिंदुहृदयसम्राट श्री २०२२ चा मानकरी

Breaking News

संकेत काळे ठरला हिंदुहृदयसम्राट श्री २०२२ चा मानकरी

 संकेत काळे ठरला हिंदुहृदयसम्राट श्री २०२२ चा मानकरी

शिवजन्मोत्सव सोहळा २०२२ निमित्त लोणावळा येथे बुधवार दि.२३ मार्च रोजी  पार पडलेल्या 'हिंदुहृदयसम्राट श्री २०२२' शरीरसौष्ठव स्पर्धेत सांगोला तालुक्याचा सुपुत्र संकेत संजय काळे यांनी प्रथम क्रमांक मिळवित 'हिंदुहृदयसम्राट श्री २०२२' हा किताब पटकाविला.


या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामुळे ही स्पर्धा अतिशय अटीतटीची पहावयास मिळाली. संकेत काळे यांनी ८५+ वजनी गटात सुवर्ण पदक व 'मोस्ट इम्प्रुव बॉडीबिल्डर' हा किताब पटकाविला.


यापूर्वीही राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत संकेत यांनी सुयश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments