आजपासून मध्यम प्रकल्प बुधेहाळ चे उन्हाळी आवर्तन सुरू होणार -आमदार शहाजी बापू पाटील.
सांगोला /प्रतिनिधी. दिनांक १९/३/२००२ रोजी मध्यम प्रकल्प बुधेहाळ चे उन्हाळी आवर्तन सुरू करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सूचना केल्याने दिनांक २५/३/२०२२ पासून मध्यम प्रकल्प बुधेहाळ लाभ क्षेत्रामध्ये उन्हाळी आवर्तनाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणार असून त्यामुळे सांगोला तालुक्यातील मौजे बुधेहाळ, हातीद ,पाचेगाव खू, उदनवाडी, चोपडी ,सरगरवाडी, झापाचीवाडी ,बलवडी ,नाझरे बंडगरवाडी व आटपाडी
तालुक्यातील यपाचीवाडी व माडगुळे या गावाला शेतीसाठी पाणी मिळणार आहे. त्यामुळे जनावराच्या चाऱ्याची पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. काही प्रमाणात उन्हाळी भुईमूग कापूस यांची शेतकऱ्यांनी तयारी केलेली आहे.शेतकऱ्यांच्या मागणी अगोदर पाणी सोडण्याचे निश्चित झाल्याने या भागातील शेतकरी आनंदातआहे .
उन्हाळी हंगामातील शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक पूर्णपणाने हाती लागण्यासाठी अजून ज्यादा पाणी लागल्यास तलावात पाणी सोडण्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन विभागास आदेश दिलेले आहेत.


0 Comments