21 हजार कि.मि सायकलिंग केल्याबद्दल सायकलपटू निलकंठ शिंदे सर त्याचा सत्कार .
सांगोला (प्रतिनिधी )सांगोल्यातील उत्कृष्ट सायकलिंग नीलकंठ शिंदे सर 372 दिवसात 21 हजार किलोमीटर सायकलिंग केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार उत्साहात त्यांच्या कार्यालयात करण्यात आला.
स्टेशन रोड येथील कापड व्यापारी अरुणतात्या कांबळे यांच्या वतीने शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विटा बँकेचे शाखाधिकारी बाळासाहेब कवडे यांनीहि सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी निलकंठ शिंदे सर यांनी एकूण प्रवास केलेल्या सायकलिंगबद्दल अनुभव सांगितले, उपस्थितांना सदृढ आरोग्यासाठी नियमित सायकलिंग करण्याचे आव्हान केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल तारळकर यांनी केले व आभार ज्येष्ठ सायकल सदस्य बाबुराव लाडे यांनी मानले. यावेळी स्टेशन रोड येथील व्यापारी व सायकलिस्ट उपस्थित होते.


0 Comments