google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. प्रविण निचत हे आंध्र प्रदेश मध्ये पुरस्कारासाठी गेले आणि अन्न वाटप करून आशीर्वाद घेऊन परतले

Breaking News

डॉ. प्रविण निचत हे आंध्र प्रदेश मध्ये पुरस्कारासाठी गेले आणि अन्न वाटप करून आशीर्वाद घेऊन परतले

 डॉ. प्रविण निचत हे आंध्र प्रदेश मध्ये  पुरस्कारासाठी गेले आणि अन्न वाटप करून आशीर्वाद घेऊन परतले

व्हिक्टरी फौंडेशनच्या वतीने बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत,  ह्यांना सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा गुंतकल, जिल्हा अनंतपूर, आंध्र प्रदेश येथे संपन्न झाला. ह्या सोहळ्यात वेग वेगळ्या ठिकाणचे पुरस्कारार्थी होते


 पार जम्मू पासून ते कन्याकुमारी पर्यंत, परुंतु विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातून   डॉक्टर प्रवीण निचत  हि एकमेव व्यक्ती होती.  व्हिक्टरी फौंडेशन ने त्यांची व त्यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेत त्यांना २०२२ चा सेवा रत्ना पुरस्कार बहाल करून त्यांना सन्मानित केले. एका अर्थानं त्यांचा सन्मान म्हणजे एका मराठी माणसाचा सन्मान आणि मराठी माणसाचा सन्मान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान.


डॉ. प्रविण निचत ( अध्यक्ष होप फौंडेशन), मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. 


त्यांचे बदलापूर येथे शतायुषी निसर्ग उपचार केंद्र असून ते  वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत.


डॉक्टर प्रवीण निचत हे गुंतकाल येथे गेले असता त्यांनी रस्त्याच्या कडेला अनेक भुकेलेले गरीब लोक दिसले त्यांनी लगेच शेजारच्या हॉटेल मधून जेवणयाचे पाकिटे बांधव घेतले व आपले सामाजिक कार्य चालू ठेवले. त्यांना जागा व वेळ कोणती ह्याचे काहीही भान नसते. अश्या ह्या आपल्या महाराष्ट्रातील ठाणे बदलापूर येथील व्यक्तीचा सन्मान दुसऱ्या प्रदेशात होणे म्हणजे हा सन्मान प्रतेय्क मराठी माणसाचा आहे. 


नेहमी लोक म्हणतात मराठी माणूस फक्त एकमेकांचे पाय ओढतो परंतु ह्या डॉक्टरांनी त्यांच्या निस्वार्थ भावनेने  केलेल्या समाज सेवेने ते खोटे ठरवले. समाजात अश्या व्यक्ती आहेत म्हणूंन कुणीही कुठेही उपाशी राहत नाही. सन्मान झाल्या बद्दल त्यांचे कौतुक तर झालेच परंतु दुसऱ्या प्रदेशात जाऊन त्यांच्या अन्नदानाचे कौतुक सर्वत्र होत आहे. त्यांना त्यांचा पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा व त्याच्या हातून अशीच निस्वार्थ समाज सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Post a Comment

0 Comments