Breaking News

सांगोला तालुक्यातील घटना सामाईक बांधाच्या वादातून लक्ष्मीनगरमध्ये डाळिंबाची बाग पेटवली

सांगोला तालुक्यातील घटना  सामाईक बांधाच्या वादातून लक्ष्मीनगरमध्ये डाळिंबाची बाग पेटवली

सांगोला ( तालुका प्रतिनिधी) : दोघा शेतकऱ्यांच्या मध्ये सामाईक असलेल्या शेतातील बांधाच्या वादातून तिघांनी मिळून भावकीतील एका शेतकऱ्याची डाळिंबाची बाग पेटवून दिली. तसेच बांधावरील लोखंडी अँगल मोडून टाकले. या आगीत डाळिंबाची झाडे होरपळून गेल्याने दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ३ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर ता. सांगोला येथे घडली.


 याबाबत केराप्पा ईश्वर गंगलमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आप्पासो बापू गंगलमाले, तानाजी बापू गंगलमाले व चंद्रकांत गंगलमाले सर्व रा. लक्ष्मीनगर ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मीनगर ता. सांगोला येथील केराप्पा ईश्वर गंगलमाले शेती गट नं ४४२ मध्ये तीन एकर शेती असून त्यामध्ये डाळिंबाची बाग आहे. 


त्यांच्या शेतीच्या बांधास लागून आप्पासो बापू गंगलमाले यांची शेतजमीन आहे. त्या दोघांमध्ये बांधाचा वाद चालू आहे. केराप्पा गंगलमाले यांनीतीन महिन्यापूर्वी शासकीय मोजणी करुन लोखंडी अँगलचे पोल हद्दीवर रोवले आहेत. ३ मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास केराप्पा यांचा मुलगा युवराज हा शेतातील डाळिंब बागेला पाणी सोडण्यासाठी कॉक चालू करण्यासाठी गेला होता. 


त्यावेळी शेजारील आप्पासो गंगलमाले व त्याचा भाऊ तानाजी, आजोबा चंद्रकांत गंगलामले हे दोघांच्या शेतीमध्ये असणारा बांध पेटवून देत होते. तसेच सरकारी मोजणी करुन रोवलेले अँगलचे पोल वाकडे करुन व मोडून टाकत होते. युवराज याने सदरचा प्रकार घराकडे येवून वडिलांना सांगीतला. त्यानंतर केराप्पा व मुलगा युवराज असे बागेत गेले


 असता आप्पासो गंगलमाले, तानाजी गंगलमाले, चंद्रकांत गंगलमाले शेतातील असणारा बांध काडीने आग लावून पेटवून देत होते. तसचे दोन डाळिंबीच्या झाडावर चगाळ टाकून पेटवून दिले होते. त्यामध्ये दोन डाळिंबाची झाडे पूर्णपणे जळून नष्ट झाली होती. तसेच सदर आगीमुळे बांधाकडील बाजूस असलेली डाळिंबीची दहा झाडे होरपाळून गेली होती. सरकारी मोजणी करुन रोवलेले लोखंडी पोल मोडून व वाकवले होते. यात केराप्पा गंगलमाले यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले


. त्यावेळी केराप्पा यांनी त्यांना असे का केले विचारले असता, हा बांध आमचा आहे, तू सरकारी मोजणी बोगस तू केली आहे असे म्हणून शिवीगाळ करीत, तू आता आग विझयलाच ये तुला बघतोच अशी धमकी दिली. याबाबत केराप्पा ईश्वर गंगलमाले यांनी वरील तिघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments