प्रत्येक देशभक्तांनी कश्मीर फाईल चित्रपट पाहिला पाहिजे धनंजय भाई देसाई यांचे वक्तव्य.
धनंजय भाई देसाई हे पंढरपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली व हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपला नियोजित दौरा संपन्न झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. धनंजय भाई पंढरपूर मध्ये येताच त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेत भारताचे हिंदुराष्ट्र करण्यासाठी बळ दे असे विठ्ठलाला साकडे घातले.
यावेळी त्यांनी हिंदू महासभेच्या कार्यालयास भेट देऊन परी संवाद साधला. त्याचबरोबर सुरू असलेल्या धर्मवीर शंभूराजांच्या बलिदानाचा दहाव्या पुष्प दिनी छत्रपती संभाजी चौक पंढरपूर या ठिकाणी शंभूराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. संध्याकाळी चंद्रभागेच्या आरतीला उपस्थित राहता चंद्रभागेचे ही दर्शन घेतले.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व दिवसभर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
दौऱ्याच्या शेवटी पत्रकार परिषदेत सध्या कपिल शर्मा शो मध्ये नाकारलेला कश्मीर फाइल्स हा चित्रपट सर्वांनी पाहावा असे त्यांनी आवाहन केलं. सत्तर वर्षांमध्ये हिंदुनी अत्याचाराचा हलाहल प्राशन केलं. आपल्या देशातून तिसरे चौथे इस्लामिक राष्ट्र होऊ नये असे वाटत असेल तर देशभक्तांनी कश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिला पाहिजे. असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. एका प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेबांच्या पक्षाचे राजकीय सुंता झाली. असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments