राज्यात 'अजितदादा' तर सोलापुरात 'विजयदादा' ;
दोघांच्या पेटाऱ्यातून काय निघाले पहा ; सोलापूर जिल्हा परिषदेचे बजेट सादर
सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचे सन 2022-23 चे बजेट सादर केले याच दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अर्थ सभापती विजयराज डोंगरे यांनी सुद्धा जिल्हा परिषदेचे सन 2022-23 चे बजेट मांडले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी स्वतः सभापती विजयराज डोंगरे यांच्या चेंबर मध्ये येऊन बजेट सादर केले. डोंगरे यांनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडाचे 41 कोटी 98 लाखाचा अर्थसंकल्प सादर केला. तीन वाजून 30 मिनिटांनी डोंगरे यांनी बजेट वाचण्यास सुरुवात केली. सभागृहात अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, कृषी सभापती अनिल मोटे, महिला बालकल्याण सभापती स्वाती षटगार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांची डायनासवर उपस्थिती होती.
सोलापूर जिल्हा परिषदेचे सलग पाच वर्ष अर्थ व बांधकाम सभापती म्हणून विजयराज डोंगरे यांनी आपली कारकीर्द पूर्ण केली मात्र या पाच वर्षात त्यांना केवळ दोन वर्षे बजेट मांडले पहिल्या बजेट वेळी आमदार संजयमामा शिंदे हे अध्यक्ष होते त्यानंतर आता अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष आहेत.2018 साली डोंगरे यांनी पहिले बजेट मांडले, त्यानंतर 2019 साली लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने बजेट मांडता आले नाही, नंतर 2020 व 2021 साली कोरोनामुळे बजेट झाले नाही.
शेवटी 2022 साली सभापती डोंगरे यांनी बजेट सादर केले. सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नावाने आदर्श शेतकरी व पशुपालक पुरस्काराची त्यांनी घोषणा केली. आपल्या भाषणात सभापती डोंगरे यांनी सर्व पदाधिकारी, अधिकारी, सर्व सदस्यांचे आभार मानले. 21 मार्चपासून जिल्हा परिषदवर प्रशासक येणार आहे मात्र प्रशासक आल्यावर विकास कामे घेताना आताच्या अस्तित्वात असलेल्या सदस्यांच्या शिफारशी घ्यावा असा ठराव मांडला.
■ बजेट 42 कोटी विभाग निहाय तरतूद खालीलप्रमाणे-
कृषी- 3 कोटी 68 लाख, शिक्षण-5 कोटी 56 लाख, आरोग्य-3 कोटी 51 लाख, समाज कल्याण-4 कोटी 59 लाख, बांधकाम-9 कोटी 87 लाख, महिला व बालकल्याण-2 कोटी 81 लाख, पशुसंवर्धन-3 कोटी 7 लाख, सामान्य प्रशासन (अधिकारी)-4 कोटी 97 लाख, जलसंधारण-1 कोटी 25 लाख, ग्रामीण पाणी पुरवठा-2 कोटी 20 लाख
सामान्य प्रशासन ग्रामपंचायत -35 लाख
■ नाविन्यपूर्ण योजना व विशेष तरतूद काय आहेत पहा
कोविड काळामध्ये काम केलेल्या अशा सैनिकांना प्रोत्साहन भत्ता म्हणून 55 लाखांची तरतूद
जिल्हा परिषद शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन करणे 1 कोटी 20 लाख
महिलांना व मुलींना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण 49 लाख,
मुलींना mscit व संगणक प्रशिक्षण 49 लाख,
महिलांना विविध साहित्य पुरवणे 80 लाख,
गोबरगॅस संलग्न शौचालय बांधकाम पूरक अनुदान 32 लाख
कृषी अभियांत्रिकी योजना 1 कोटी 25 लाख,
कृषी सिंचनासाठी औजारे 75 लाख,
समाज कल्याण शेळीपालन गट 50 लाख,
अपंगांना शेळीपालन गट 67 लाख,
पाझर तलाव दुरुस्ती 1 कोटी
ग्रामीण रस्ते बांधकाम 4 कोटी 40 लाख

0 Comments