Breaking News

अन्यथा नोकरी कायमची गमवावी लागेल एसटीकडून संपकरी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

 अन्यथा नोकरी कायमची गमवावी लागेल 


एसटीकडून संपकरी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना १० मार्चपर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. मात्र या आवाहनाला कर्मचाऱ्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. आतापर्यंत ६८ चालक – वाहक कामावर रुजू झाले असून अद्याप ६० टक्के कर्मचारी संपात सहभागी असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. परिणामी राज्यातील एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


त्यामुळे प्रवाशी वाहतूक व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. चार महिन्यांत वारंवार आवाहन करूनही बहुतांश कर्मचारी अजून कामावर रूजू झालेले नाहीत. दरम्यान, अद्याप कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने कर्मचाऱ्यांना नोकरी कायमची गमवावी लागेल, असा इशारा एसटी महामंडळाकडून देण्यात आला आहे.


गेल्या चार दिवसांत ६८ कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर हजर होण्यास प्राधान्य दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप अभूतपूर्व ठरला आहे. चार महिन्यांहून अधिक काळ तो सुरूच असल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कामावर हजर होणाऱ्या चालक वाहकांना पुन्हा प्रशिक्षण देण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे कामावर रूजू झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.

Post a Comment

0 Comments