आम्ही आता निवडणुका होण्याची वाट पाहतोय
निवडणुका आल्या म्हणजे आम्ही ' शिस्तबद्ध ' कार्यक्रमच राबवितो . सर्व तयारी झालेली आहे , केवळ निवडणुका येण्याचीच आम्ही पाहतोय . वाट ग्रामीण भागात पक्ष संघटना बळकट करण्याचे काम हे अगदी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सुरू आहेत .
जिल्हा परिषद , पंचायात समिती व पालिका निवडणुकीत भाजपची सरशी होणार हे फिक्सच आहे . पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूक असो किंवा नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुका यातील सर्व कार्यक्रम आमच्या पक्षाकडून अगदी आखीव रेखीवच आखला आणि भाजपचाच वरचष्मा दिसला . देशात भाजपचे सरकार आहे .
केंद्र सरकारने सर्वसामन्यांसाठी व गोरगरीबांसाठी अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत . सर्वसामन्य माणसाच्या हितासाठी राज्यात व स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही भाजपचेचे राज्य असणे आवश्यक आहे . यासाठी पक्षपातळीवर सर्व तयारी पूर्ण झालेली आहे .
विरोधकांनी किती फूट पाडण्याची कारस्थाने केली तरी भाजप एकसंध आहे . पक्षबांधणीचे काम झाले आहे . शक्तीकेंद्र प्रमुख , बुथ प्रमुख , बुध समिती , पेजप्रमुख यांची रचनाही पूर्ण झाली असून जिल्हाभर मेळावे सुरू आहेत . जिल्ह्यात आमचे सर्वाधिक आमदार , खासदार आहेत .
या संख्येत यापुढे नक्कीच वाढ होणार आहे . राज्य सरकारविरुद्ध आवाज उठवत असताना अनेक संकट आली तरी न डगमगता काम सुरू आहे . भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुमारे ८१ राजकीय गुन्हे दाखल झाले . मात्र , न घाबरता राज्य सरकारविरुद्ध मोर्चे , आंदोलन आणि निदर्शने सुरु ठेवली आहेत . येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकवला जाईल अशी आमची तयारी पूर्ण झाली आहे .

0 Comments