google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्वांचा डोळा गावरान कोंबड्यावर ; बघा रे कोंबड्यावर लक्ष ठेवा, पहा सोलापूर झेडपीत काय घडले

Breaking News

सर्वांचा डोळा गावरान कोंबड्यावर ; बघा रे कोंबड्यावर लक्ष ठेवा, पहा सोलापूर झेडपीत काय घडले

 सर्वांचा डोळा गावरान कोंबड्यावर ; बघा रे कोंबड्यावर लक्ष ठेवा, पहा सोलापूर झेडपीत काय घडले

 सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागातील कनिष्ठ सहाय्यक शिवाजी राठोड यांनी लॉकडाऊन मधील कालावधीत वेळेचा सदुपयोग करून स्वतःमध्ये असलेल्या सुप्त कलेला वाव दिला आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कलानिर्मिती केली आहे त्यांनी केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन गुरूवारी जिल्हा परिषदेच्या बागेमध्ये ठेवण्यात आले होते. 


या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाले.


या शिल्पकलेमध्ये हरीण, गेंडा, तनमोर, डायनासोर, गावरान कोंबडा, गोगलगाय, ससा, हत्ती, अस्वल, बदक, बैल, कोल्हा, माळढोक, बदक, खारुताई, बेडूक, चितळ, गरुड, फ्लेमिंगो, पेलिसीअन असे विविध प्राणी व पक्षी सिमेंटपासून बनवण्यात आले आहेत. या सुंदर कलाकृती पाहण्यासाठी जिल्हा परिषद आवारात गर्दी झाली होती. यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी या कलाकृतींची पाहणी केली. 


पाहणी करताना गावरान कोंबड्या कडे पाहून स्वामी यांनी हा कोंबडा हुबेहूब दिसतोय  लक्ष ठेवा त्याच्यावर असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. तसेच यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी बागेमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने पक्षी आणि प्राण्यांची साठी केलेल्या पाणी पिण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली.


उद्घाटननंतर स्वामी म्हणाले, राज्य सरकारकडे कला व सांस्कृतिक विभाग आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांमधील कलागुणांना वाव मिळाला पाहिजे त्यांचे कलागुण समोर आले पाहिजेत आणि अशा कलाकृतींना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments