Breaking News

सांगोल्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून चार राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा

 सांगोल्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून चार राज्यातील विजयाचा जल्लोष साजरा

सांगोला (प्रतिनिधी) :उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या चारही राज्यात भाजपने विरोधकांचा सुपडा साफ करून भाजप सत्ता कायम ठेवणार असल्याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले. पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालात चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा ठरल्याने सांगोला तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाबाहेर पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत, घोषणा देत जल्लोष साजरा केला.


उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात उत्तर प्रदेशसह, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले. चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा ठरल्याने सांगोला तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयाबाहेर पेढे वाटून, घोषणा देत जल्लोष साजरा केला. 


यावेळी बोलताना चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजपची वाटचाल पुन्हा एकदा प्रभावी राहिल्याचे निवडणुकींच्या निकालातून दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक मते मिळाली असून भाजप उमेदवारांची संख्या प्रथम क्रमांकावर राहिली आहे. येणाऱ्या काळात देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील भाजपचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी शिवाजीराव गायकवाड, अनिल कांबळे वसंत सुपेकर, डॉ. जयंत केदार, सुरज पाटील, नरेश बाबर, बाळाप्पा येलपले, विजय बाबर, गणेश कदम, संजय गव्हाणे, डॉ. मानस कमलापूरकर, विजय इंगवले, विजय ननवरे, प्रवीण जानकर, विकास केदार, सुरेश बुरांडे, पप्पू गायकवाड, संग्राम गायकवाड, विकास वलेकर, आप्पसो शिंदे, प्रवीण इंगोले, दीपक केदार, प्रसाद फुले, स्वप्नील रामदासी, महेश चौधरी, गंगाधर देशपांडे, दीपक केदार, रोहित सावंत, विनोद उबाळे, आकाश सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments