Breaking News

सोशल मीडियावरील चॅटवरून वाद पेटला जत तालुक्यात दोन तरुणांचा खून , एक गंभीर

 सोशल मीडियावरील चॅटवरून वाद पेटला जत तालुक्यात दोन तरुणांचा खून , एक गंभीर

जत ( प्रतिनिधी ) : सोशल मिडीयावर चॅटींग केल्याच्या वादातून दोन तरुणांचा खून झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी मध्ये घडली आहे . यामध्ये एक तरुण गंभीर जखमी देखील झाला आहे . मध्यरात्री १२ वाजता मंगळवेढा रोडवर ही घटना घडली आहे . मयताच्या अंगावर वार झालेले असून या गुन्ह्यात तलवार देखील वापरली असून या शिवाय दगड , काठ्याचा देखील या गुन्ह्यात वापर करण्यात आला आहे . या प्रकरणी सात संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक तपास करत आहेत . जत तालुक्यातील उमदी येथे मध्यरात्री १२ वाजता मंगळवेढा रोडवर दोन गटात तुफान हाणामारी

झाली . या हाणामारीत दोन तरुणांचा निर्घृण खून झाला . तर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे . जखमी तरूणांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तरुणाला दाखल करण्यात आले आहे . सोशल मीडीयावर चॅट केल्याचा राग मनात धरून तरुणांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे . तर यामध्ये सात संशयित सोशल मीडियावरील चॅटवरून वाद पेटला जत तालुक्यात दोन तरुणांचा खून , एक गंभीर

आरोपी सध्या पोलिसाच्या ताब्यात आहेत . अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत . उमदी येथे खून दोन जण मयत एक गंभीर जखमी या घटनेत मयत झालेल्या गुंडा उर्फ मदगोंडा बगली व संतोष राजकुमार माळी तर गंभीर जखमी झालेल्या प्रकाश परगोंड याला सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे . ग्रुपवरील मोबाईल चॅटिंगवरून ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे . घटनेत तलवार , दगड , काठी व चाकूचा वापर केल्याचे समजते . उमदीपासून दोन किलोमीटर अंतरावर उमदी ते पंढरपूर मंगळवेढा हायवेवर ही घटना घडली आहे . या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलिस करत आहेत .

Post a Comment

0 Comments