google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट…पुढील चार दिवस भरदुपारी घराबाहेर पडणे टाळा!

Breaking News

मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट…पुढील चार दिवस भरदुपारी घराबाहेर पडणे टाळा!

 मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट…पुढील चार दिवस भरदुपारी घराबाहेर पडणे टाळा!

 विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात काही भागांत पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भातील काही शहरांचे तापमान ४३ ते ४४ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तापमान वाढत असल्याने सूर्याचा यूव्ही इंडेक्स (अतिनील किरणे) ११ या सर्वाधिक जाेखमीच्या पातळीवर असेल. त्यामुळे पुढील चार दिवस सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान थेट सूर्यप्रकाशात जाणे धोक्याचे ठरणार आहे.


राजस्थान, गुजरातसह वायव्येकडून येणारे शुष्क उष्ण वारे राज्यात धडकले आहेत. या वाऱ्यांचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यावर होणार आहे. या आठवड्यात राज्यात तापमान चाळिशी पार गेले असून येत्या एक एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट तीव्र होणार आहे. या लाटेचा परिणाम मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रावरदेखील होणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मार्च महिन्यात दुसऱ्यांदा राज्यात उष्णतेची लाट आली असून तापमान पुन्हा एकदा ४३ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

 

मार्च महिन्यात दुसऱ्यांदा धडकली लाट

या वर्षी मार्च महिन्यात १७ ते १९ मार्चदरम्यान विदर्भ, काेकणात उष्णतेची लाट धडकली होती. २९ मार्च ते १ एप्रिलदरम्यान दुसरी उष्णतेची लाट येणार आहे. या लाटेचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यात जाणवेल. विदर्भात २८ मार्च रोजी अकाेला शहराचे तापमान सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सियस होते. पुढील चार दिवसांत ते ४४ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.


मराठवाडा आणि विदर्भावर सर्वाधिक प्रभाव २९ मार्च ते १ एप्रिलदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट असेल. लगतचा प्रदेश असल्याने या लाटेचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रावरदेखील जाणवेल. वायव्येकडील राज्याकडून वाहत येणाऱ्या गरम हवेमुळे या लाटेची तीव्रता वाढेल. दरम्यान, या लाटेनंतरही तापमानात वाढ होणार आहे. – डाॅ. अनुपम कश्यपी, भारतीय हवामान खाते, पुणे.

Post a Comment

0 Comments