महिला दिनाच्या पूर्व संध्येला बलात्काराच्या गुन्हात आरोपी न करण्यासाठी 37 लाखाच्या लाचेची मागणी ;
7 लाख अॅडव्हान्स घेताना पोलिस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात ,
2 लाख वरिष्ठ निरीक्षकासाठी तर 30 लाख पीडितेसाठी
महिला दिनाच्या पूर्व संध्येला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . महिलेची समजूत घालून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकांने तब्बल ३७ लाख रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे . त्यापैकी ७ लाख रुपयांची लाच घेताना लाच विभागाने उपनिरीक्षकाला अटक केली आहे . भरत लक्ष्मणराव मुंढे ( वय लुचपत प्रतिबंधक सापळा रचून पोलीस ३३ ) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे . मुंढे हा सध्या ना . म . जोशी मार्ग पोलीस ठाण्यात Marg नेमणुकीला आहे . Police Station ) याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार , मुंबईतील ना . म . जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे . त्याचा तपास भरत मुंढे याच्याकडे आला होता . त्याने यातील आरोपीशी संपर्क साधला . त्याला गुन्ह्यात अटक करु नये , यासाठी लाच मागितली . तसेच त्याच्या नातेवाईकालाही सहआरोपी करण्याची धमकी दिली . त्यानंतर मुंढे याने गुन्ह्यातील बलात्काराच्या तक्रारदार हिची समजूत घालून त्याच्याविरुद्ध तक्रार त्याने यासाठी करु नये , तक्रारदाराकडे स्वत : साठी ५ लाख , वरिष्ठ निरीक्षक याच्यासाठी २ लाख व बलात्काराच्या गुन्ह्यातील फिर्यादीला देण्यासाठी ३० लाख रुपये अशी एकूण ३७ लाख रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली . त्याची ४ मार्च रोजी पडताळणी केली . त्यात भरत मुंढे याने ३७ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले . त्यानंतर या ३७ लाखांपैकी ७ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत भरत मुंढे याला प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले .

0 Comments