google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अपघातात मृत्यू झाल्यास मिळणार 2 लाख रुपये, ‘हिट अँड रन’बाबतही मोदी सरकारचा मोठा निर्णय…!

Breaking News

अपघातात मृत्यू झाल्यास मिळणार 2 लाख रुपये, ‘हिट अँड रन’बाबतही मोदी सरकारचा मोठा निर्णय…!

 अपघातात मृत्यू झाल्यास मिळणार 2 लाख रुपये, ‘हिट अँड रन’बाबतही मोदी सरकारचा मोठा निर्णय…!

जगात भारतात सर्वाधिक रस्ते अपघात होतात नि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.. 2019 मध्ये भारतात तब्बल 2,35,929 अपघात झाले नि त्यात 92,837 जणांचा मृत्यू झाला.. तर 2020 मध्ये रस्ते अपघातात 1,20,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला.. रोजचा विचार केल्यास, दिवसाला सरासरी 328 मृत्यू हे फक्त अपघातात झाल्याचे दिसते..


अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्यास सारे कुटुंब उघड्यावर पडते. ही बाब लक्षात घेऊन मोदी सरकारने येत्या 1 एप्रिल 2022 पासून देशात नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मृताच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे..


नव्या नियमांबाबत..

मोदी सरकारच्या या नव्या नियमानुसार, ‘हिट अँड रन’ प्रकरणात पीडित व्यक्तीसाठी नुकसान भरपाईची रक्कम 12,500 रुपयांवरुन आता 50,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच, रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास, मृताच्या नातेवाईकांना 25,000 रुपयांची भरपाई रक्कम देण्यात येत होती. त्याऐवजी आता ती 2 लाख रुपये करण्यात आली आहे..


रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून, येत्या 1 एप्रिल 2022 पासून नवे नियम लागू केले जाणार आहेत. भारतात रस्ते वाहतूक आणि राजमार्गावरील अपघातासाठी हे नियम लागू करण्यात येणार आहेत. शिवाय, ‘हिट अँड रन’ प्रकरणात पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यासाठी ‘मोटर व्हेईकल दुर्घटना फंड’ तयार केल्याची माहिती देण्यात आली.


हाही एक बदल..

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वरील नियमांबरोबरच आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार, आता ‘रिजिड’ वाहने, दुचाकी वाहून नेणाऱ्या ट्रेलरमध्ये आता जास्तीत जास्त तीन डेक ठेवता येणार आहेत. मंत्रालयाने तशी परवानगी दिली आहे. त्यामुळे वाहने वाहून नेण्याची क्षमता 40 ते 50 टक्क्यांनी वाढणार आहे. अर्थात, ट्रेलरचा कॅरेजचा भाग ड्रायव्हरच्या केबिनवर नसावा, अशी अट ठेवली आहे..


रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाने याबाबत 25 फेब्रुवारीला अधिसूचना जारी केली आहे.. केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये त्यानुसार बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले..

Post a Comment

0 Comments