google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महिलेच्या अंगातील भुत काढतो म्हणत भोंदूबाबाने केला अत्याचार

Breaking News

महिलेच्या अंगातील भुत काढतो म्हणत भोंदूबाबाने केला अत्याचार

 महिलेच्या अंगातील भुत काढतो म्हणत भोंदूबाबाने केला अत्याचार


अंगात भूत आहे असे सांगुन जादूटोणा करत भुत उतरविण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने रात्रभर महिलेवर अत्याचार केला आहे…….. पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेला भूतबाधा झाली 


असल्याचे सांगून तिच्यावर जादूटोणा द्वारे मंत्रोपचार करण्यासाठी आलेल्या एका मांत्रिकानेच त्या महिले वर अत्याचार केला आहे . त्या महिलेच्या अंगातले भूत खुप शक्तीशाली असल्याचे सांगून त्या मांञिकाने 


नातेवाइकांना देखील घराबाहेर काढले. गरीब कुटुंबातील महिलांचे आजारपणाबाबतचे अज्ञान व उपचारासाठी पैशाची चणचण , यातून अंधश्रद्धेचे खतपाणी हे घातले जाते . याच कारणाने पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगुन तिच्यावर मंत्रोपचार करण्यासाठी आलेल्या 


मांत्रिकानेच त्या महिले वर अत्याचार केला आहे . दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे या मांत्रिकाने भूत शक्तीशाली आहे . असे सांगून महिलेच्या नातेवाइकांना देखिल घराबाहेर काढले व तिथेच रात्रभर त्या महिलेचं शोषण करुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला आहे .


 आधुनिक युगात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत समाजमाध्यमांसोबतच विविध टीव्ही मालिकांमधुनही अंधश्रद्धेचा भांडाफोड केला जातोय . त्यानंतरही परिस्थितीने मजबुर लोक अज्ञानातच गुरफटलेली असते . 


याचाच फायदा काही वाईट लोक घेत असतात . असेच काहीसे यवतमाळातील नागपूर रोड परिसरात राहणाऱ्या महिलेच्या बाबतीत घडले आहे . तिची प्रकृती चांगली राहत नसल्याने पतीने घराबाहेर काढले होते . आई – वडील नसल्याने ती महिला नातेवाइकांकडे आश्रयाला होती . 


वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण सांगून तिच्याच एका नातेवाइकाने तेलंगणातील • आदिलाबाद येथन ओळखीच्या मांत्रिकाला बोलाऊन घेतले .शेखर आण्णा असे ह्या मांञिकाचं नाव आहे . हा मांत्रिक त्याच्या दोन चेल्यांना घेऊन यवतमाळात येथे आला . 


गुरुवारी ( दि . २७ ) या मांत्रिकाने पीडित महिलेची तपासणी केली . महिलेला कोणतीही भुतबांधा नाही तरी देखील मांत्रिकाने डाव रचला . या महिलेला भूतबाधा झाली असून , हे पिश्याच्य तत्काळ बाहेर काढणे गरजेचे आहे . हे भूत मोठे शक्तीशाली आहे . त्याच्यापासून केवळ त्या महिलेची सुरक्षा करू शकतो . 


महिलेवर मंत्रोपचार करताना चिडलेली भूत तेथे उपस्थित इतरांना नुकसान पोहोचवू शकते . त्यातून झालेल्या नुकसानीची जबाबदारी माझी नाही , असे मांत्रिकाने सांगितले . यावर उपायाची विचारणा महिलेच्या कुटुंबीयांनी केली असता , महिलेला व मला एकांतवास हवा . तेथेच हा विधी करता येईल ,


 असे सांगितले . भाबड्या नातेवाइकांनी यावर विश्वास ठेवून स्वत : चे घर व त्या पीडित महिलेला मांत्रिकाच्या ताब्यात दिले . मांत्रिकाने पीडित महिलेवर रात्रभर अत्याचार केला . यामुळे महिला आणखीच धास्तावली . तिला काहीच सुचेनासे झाले . सकाळी मांत्रिक व त्याचे साथीदार पसार झाले .


 भानावर आल्यानंतर महिलेने राञी मांञिकाने तिच्यावर केलेला अत्याचारा बाबत आपल्या नातेवाइकांजवळ सांगितले . अखेर पीडित महिलेला घेऊन नातेवाइकांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठले . याप्रकरणी मांत्रिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस या मांत्रिकाच्या शोधात आहेत.

Post a Comment

0 Comments