Budget 2022: अर्थमंत्र्यांकडून 5 नदीजोड प्रकल्पाची घोषणा
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे. कोरोना काळामुळे आर्थिक स्थिती बिकट असताना अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा करून जनतेला दिलासा दिला आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी 5 नदी जोड प्रकल्पाची घोषणा केली आहे.
अर्थमंत्र्यांकडून 5 नदी जोड प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तापी नर्मदा, कृष्ण पेन्नार, गोदावरी कृष्णा, दमनगंगा नदी जोड प्रकल्प केला जाणार आहे.
पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसाठी 60000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५ नदी जोड प्रकल्पाचा डीपीआर तयार केला आहे. ६८ लाख लोकांसाठी पेयजल योजना राबण्यात येणार आहे.
दरम्यान, रोजगारासाठी देखील केंद्राने पुढाकार घेतला आहे. देशात 60 लाख नवीन रोजगार निर्माण करणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं.

0 Comments