google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तोतया पोलिसाने २ लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला ; पंढरपूरातील घटना !

Breaking News

तोतया पोलिसाने २ लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला ; पंढरपूरातील घटना !

 तोतया पोलिसाने २ लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला ; पंढरपूरातील घटना !



पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने महिलेच्या दोन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना पंढरपूर मध्ये घडलेली आहे . या घटनेमुळे पंढरपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


 घरफोडी , वाटमारी यासारख्या घटना वारंवार घडत असताना , पंढरपूर शहरात नवा प्रकार घडला आहे . पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने महिलेच्या दोन लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे . कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालया जवळून जुना अकलूज रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.


 डोंबे गल्लीत राहणारे डॉ . सारंग शहा आणि त्यांची पत्नी सीमा शहा हे दुचाकीवरून आपल्या नातेवाईकाकडे जात होते . येथील गांधी बंगल्याजवळ आले असतात पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वाराने त्यांना थांबवले.


पोलीस असल्याची खात्री दिली . आपल्या गळ्यातील दागिने पर्समध्ये ठेवा , असा आदेश आपल्या वरिष्ठांचा आहे , असे सांगून विश्वासात घेतले .यावेळी शहा यांनीआपल्या जवळील दागिने पर्समध्ये ठेवले . पर्समधील दागिन्यांची खात्री करण्यासाठी या भामट्याने पर्स हातात घेतली आणि दागिने पेपरमध्ये गुंडाळून पर्स महिलेच्या हातात दिली.


यावर घरी जाऊन खात्री करताना सदर महिलेस आश्चर्याचा धक्का बसला . पोलीस असल्याची बतावणी करून भामट्याने आपल्याला हातोहात गंडविले असल्याची खात्री त्यांना पटली . यावर हे दांपत्य पोलीस ठाण्याकडे धावले , आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


चोर चोरी करण्यासाठी विविध युक्त्या वापरताना आढळतात . पंढरपूर शहरात यापूर्वीही पोलीस असल्याची बतावणी करून दागिने सुटल्याचे प्रकार घडले आहेत . हे सर्व प्रकार माहीत असतानाही नव्याने पुन्हा तेच प्रकार घडताना दिसतात . 


अशाच प्रकारची घटना पंढरपूर शहरात पुन्हा घडली आहे . शहरातील शहा दांपत्य बनावट पोलिसाच्या युक्तीला बळी पडले आहे. सुमारे सव्वा लाख रुपयांचे हातातील सोन्याच्या पाटल्या , आणि अडीच तोळ्याचे मंगळसूत्र असा १ लाख ८७ हजार रुपयांचे सोने या तोतया पोलिसाने गायब केले आहे .

Post a Comment

0 Comments