सोलापूर : कोविड पॉझिटिव्ह नावाखाली 'गोवा दौरा'? सर्वत्र चर्चा
सोलापूर : आमची सोलापूर जिल्हा परिषद काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त झाली होती. सुमारे 40 ते 50 अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली. कार्यालये ओस पडली, भीतीने कर्मचारी झेडपीत दिसले नाहीत. जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग तर चांगलेच धोक्यात आले. सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग हा आरोग्य विभागात झाला.
आरोग्य विभाग,शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, समाज कल्याण, अर्थ विभाग, सामान्य प्रशासन विभाग यामध्ये कोरोना घुसला. बापरे आता कसे होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र हा व्हायरस इतका स्ट्रॉंग नव्हता. घशाच्या खाली उतरलाच नाही. सगळेच बरे झाले. सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मात्र कोविड पॉझिटिव्ह नावाखाली अनेकांनी गोवा दौरा केल्याची चर्चा आता जिल्हा परिषदेत जोरदार सुरू झाली आहे. अनेकांचे फोटो दाखवले जात आहेत. आणि हा दौरा ते लोक जेव्हा कोविड पॉझिटिव्ह होऊन होम आयसोलेट होते तेव्हाच्या काळातील असल्याचे त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी बोलत आहेत.
विशेष म्हणजे हा दौरा त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याने ऑर्गनायझ केला असल्याची माहिती समोर येत आहे. सोलपुरातले थंड वातावरण सोडून गोव्याची गर्मी त्या लोकांनी घेतली. जिल्हा परिषदेच्या एका ज्येष्ठ सदस्याने सुद्धा या दौऱ्या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे तर या विभागाच्या कारभारावर प्रचंड असे नाराज आहेत. एचओडी बैठकीत ते या अधिकाऱ्याला झापतात, अशा अधिकाऱ्यामुळे जिल्हा परिषद बदनाम होत असल्याची जोरदार चर्चा आहे.

0 Comments