राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुलाखतीस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शुक्रवारी होणार निवडी
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसापासून सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद नोंदणी अभियान सुरू
सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यात अत्यंत वेगाने आपली पाळेमुळे खोलवर रुजवत असलेल्या व विशेषता विद्यार्थी तसेच तरुणांमध्ये अत्यंत वेगाने लोकप्रिय ठरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचा पदाधिकारी विस्तार कार्यक्रम पक्षाच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. तालुक्यातील इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या बुधवार दि 16 फेब्रुवारी रोजी सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे मुलाखती घेण्यात आल्या.
या मुलाखतीस तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला. इच्छुक उमेदवारांच्या निवडी शुक्र. दि 18 फेब्रु. रोजी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करून बुधवार दि 16 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इच्छुक पदाधिकारी मुलाखत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी निरपेक्ष व निस्वार्थी भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सेवा करणाऱ्या स्व. आर आर पाटील यांच्या स्मृतीला अनेकांनी उजाळा दिला.
तसेच राष्ट्रवादीचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणीच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष व पदाधिकारी निवडीस निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले कृष्णात माळी, सांगोला तालुका अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहर अध्यक्ष तानाजीकाका पाटील, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष अनिलनाना खटकाळे,
जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले, मा नगरसेवक ज्येष्ठ नेते शिवाजीनाना बनकर, मधुकर बनसोडे, योगेश खटकाळे, सतीश काशीद पाटील, संतोष पाटील, राज मिसाळ, गिरीश पाटील, सूर्याजी खटकाळे आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुक्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती निरीक्षक व सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतल्या. पक्षवाढ, विस्तार तथा पक्षाचा प्रसार करणे विषयी उपस्थितांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. तरुणांनीही अगदी उत्स्फूर्तपणे सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देत पक्षाचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या सर्व तरुणांच्या निवडीचा कार्यक्रम
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दि 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून होणार आहे या कार्यक्रमासाठी मुलाखत दिलेल्या सर्व इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह उपस्थित राहावे. असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे यांनी शेवटी केले.

0 Comments