राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न
सांगोला/प्रतिनिधी :सांगोला शहरातील राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेच्या वतीने काल हळदी- कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. राणीताई कोळवले, शेतकरी सह. महिला सूतगिरणीच्या व्हा. चेअरमन शिंगाडे मॅडम, नगरपरिषदेच्या
माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा व पतसंस्थेच्या संस्थापिका सौ. राणीताई माने, माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन प्रियांका श्रीराम, संचालिका जानकी घाडगे, स्वप्नाली सादिगले, कविता वाघ, सिंधूताई भोकरे, नकुशा जानकर, राणी संजय माने, पतसंस्थेच्या सचिव मनीषा हुंडेकरी, पल्लवी कांबळे, निलिमा बनसोडे यांच्यासह शहरातील इतरही महिला वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमावेळी शेतकरी सह. महिला सूतगिरणीच्या व्हा. चेअरमन शिंगाडे मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना पतसंस्थेच्या सचिव मनीषा हुंडेकरी यांनी तर उपस्थितांचे आभार पल्लवी कांबळे मॅडम यांनी मानले.
0 Comments