google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश

Breaking News

राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश

 राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश 

सांगोला (प्रतिनिधी): भास्कर रेड्डी स्टेडियम युसुफगुडा, हैदराबाद येथे 13 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न झालेल्या सीएम चषक कराटे स्पर्धेमध्ये सांगोला येथील वाघमारे सरांच्या कराटे क्लासच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.


या स्पर्धेत वाघमारे कराटे क्लासच्या अठरा मुलांचा सहभाग होता. यामध्ये कता प्रकारात आदित्य सुतार, वेदांत साळुंखे यांनी सुवर्णपदक पटकाविले, तरुण कुमावत, आशिष कोकरे यांनी रौप्य तर आदर्श गवंड, रुद्र करे, प्रताप करे, रोहित अरबळी, तेजस पिंगळे, श्रेयश पिंगळे, अयान खान, सान्वी माने, बिदिशा कर, साईकृष्णन नायडू, राधिका गारळे, यशोलक्ष्मी मगर, सिद्धांत कांबळे, मयांक स्वामी यांनी कास्य पदक मिळवित यश संपादन केले.


कुमिते गटात राधिका गारळे, रुद्र करे, महंत स्वामी, आशिष कोकरे, सिद्धांत कांबळे यांनी सुवर्णपदक, यशोलक्ष्मी मगर, सानवी माने यांनी रौप्यपदक तर साई कृष्णन नायडू, बिदीशा कर यांनी कास्य मिळविले.


सदर स्पर्धेमध्ये मुख्य रेपली मुख्य रेफ्री म्हणून निजेंद्र चौधरी, श्रावणी वाघमारे, सुनील वाघमारे सर यांनी काम पाहिले. यशस्वी स्पर्धकांना वाघमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी स्पर्धकांचे प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, भाई राजू मगर, माजी उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, स्वातीताई मगर, अनिता इंगवले मॅडम, फिल्मप्रोडूसर जयंत लांडे, बापू भाकरे प्रताप इंगवले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments