google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेत सांगोलचा सुजित बाबर प्रथम डेटा हॅकाथॉन आणि डेटा स्टोरीज स्पर्धेतही पटकविला प्रथम क्रमांक

Breaking News

स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेत सांगोलचा सुजित बाबर प्रथम डेटा हॅकाथॉन आणि डेटा स्टोरीज स्पर्धेतही पटकविला प्रथम क्रमांक

 स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेत सांगोलचा सुजित बाबर प्रथम

डेटा हॅकाथॉन आणि डेटा स्टोरीज स्पर्धेतही पटकविला प्रथम क्रमांक

सांगोला (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने सहभाग घेतला आहे. स्वच्छ भारत / महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धा (स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज), डेटा हॅकाथोन, डेटा लेख स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत सुजित बाबर यांनी प्रथम क्रमांक मिळवित सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.



स्वच्छता मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे हा या स्पर्धेचा उददेश होता. त्याअनुषंगाने गठीत समितीने स्पर्धकांचे मुल्यमापन करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. गठीत समितीमध्ये आयुक्त राजेश पाटील, आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, अमोल देशपांडे यांचा समावेश होता.



स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धेत सुजित बाबर, ट्रान्सफिगर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेत सरकारी कार्यालयांतर्गत चालणा-या सेवा, योजना, माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. येथे त्यासाठी विजेत्यांनी Software application चा वापर केला आहे जेणेकरुन प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती पोहचवणे शक्य आहे.


तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइज ऑफ पुणे युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत पीसीएमसी ओपन डेटा वीकमध्ये आयोजित हॅकाथॉन, ब्लॉग रायटिंग आणि डेटा स्टोरीज स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये ही हॅकाथॉन आणि डेटा स्टोरीज या स्पर्धेत ही सुजित बाबर यांनी प्रथम क्रमांक मिळविला


सुजित बाबर हे सांगोलाचे सुपुत्र असून त्यांनी रोंगे अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक शास्त्रात पदवी पूर्ण केली आहे.त्यांनी सांगोला येथे नोंदणीकृत माहिती तंत्रज्ञान कंपनी Transfigure Technologies कंपनी सुरू केली.ते पिंपरी चिंचवड इनक्युबेशन सेंटरचा भाग आहे.

Post a Comment

0 Comments