google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगल कार्यालयातील वेश्या व्यवसायावर धाड सांगोला पोलिसांची कारवाई ; महिला ताब्यात

Breaking News

मंगल कार्यालयातील वेश्या व्यवसायावर धाड सांगोला पोलिसांची कारवाई ; महिला ताब्यात

 


मंगल कार्यालयातील वेश्या व्यवसायावर धाड सांगोला पोलिसांची कारवाई ; महिला ताब्यात

 सांगोला , उपविभागीय ता . ९ : मंगळवेढा पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी सांगोला शहरातील एका मंगल कार्यालयावर बुधवार ( ता . ९ ) रोजी रात्री उशिरा धाड टाकली . तेथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिला व पुरुषांना ताब्यात घेतले आहे .


 रात्री उशिरापर्यंत ही कारवाई व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होती . उपविभागीय पोलिस अधिकारी  राजश्री पाटील , सांगोल्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप व एका सामाजिक संस्थेच्या मदतीने ही धाड टाकण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे . 


शहारातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंगल कार्यालयामध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता . रात्रीच्या वेळी अचानकपणे ही धाड टाकण्यात आली . तेथे काही महिला व पुरुष यांना ताब्यात घेऊन तसेच यामध्ये अजुन कोण यामध्ये सामील असल्याची माहिती घेवून कारवाई करण्याचे काम सांगोला पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते .


 या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे . या कारवाईमुळे शहरात रात्री सगळीकडे चर्चा सुरू होती . अशा सुरू असणाऱ्या अवैध व्यवसायावर अशाप्रकारे कायमच कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे .

Post a Comment

0 Comments