google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ग्रामीण रुग्णालय बनले रेफर रुग्णालय ; डॉक्टरांच्या उदासीनतेमुळे गर्भवती महिलांची प्रसूती,सिझर करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Breaking News

सांगोला ग्रामीण रुग्णालय बनले रेफर रुग्णालय ; डॉक्टरांच्या उदासीनतेमुळे गर्भवती महिलांची प्रसूती,सिझर करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

 सांगोला ग्रामीण रुग्णालय बनले रेफर रुग्णालय ; डॉक्टरांच्या उदासीनतेमुळे गर्भवती महिलांची प्रसूती,सिझर करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

सांगोला ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर , कर्मचा-याची , सुविधा असून देखील केवळ डॉक्टरांच्या उदासीनतेमुळे गर्भवती महिलांची प्रसूती , सिझर करण्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे रेफर करण्यावर भर दिला जात आहे .


कामुचकार , रुग्णसेवेत हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांना वारंवार पाठीशी घातले जात असल्याने सामान्यांना त्रास होत आहे . ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गर्भवती महिलांना रेफर करून हात वर करत असल्याने सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे . विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन कार्यान्वित असतानाही केवळ थिएटर डॉक्टरांच्या अनास्थेमुळे गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे . 


सांगोला ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब गर्भवतींना प्रसूतीसाठी आणल्यावर त्यांना रेफर टू पंढरपूर केले जात असल्याची ओरड वाढली आहे . त्यामुळे गोरगरिबांनी काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थितीत झाला आहे . आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडता सांगोला ग्रामीण रुग्णालयात मनमानी कारभार सुरू असुन ग्रामीण रुग्णालय रेफर रुग्णालय बनल्याने नातेवाईकांसाठी डोकेदुखी ठरले आहे . 


गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्ण उपचारासाठी खाजगी दवाखान्याचा आधार घेत असल्याने सांगोला ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे चालला आहे . सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असले तरी डॉक्टरांच्या सर्वसामान्य उदासीनतेमुळे कुटुंबातील रुग्णांची उपचारांसाठी हेळसांड होत आहे . 


प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांच्या तसेच डॉक्टरांच्या उदासीन व रेफर करण्याच्या भूमिकेमुळे अनेक रुग्णांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयाकडे पाठ फिरवली आहे . ग्रामीण रुग्णालयात मनुष्यबळ असतानाही केवळ डॉक्टरांच्या उदासीनतेमुळे प्रसूती , सिझर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करीत सर्वसामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे . ग्रामीण रुग्णालयात स्थानिक डॉक्टर कार्यरत असल्याने केवळ कधीतरी हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे . 


कोट्यवधी खर्च करून सुसज्ज इमारत , सुविधा उपलब्ध असतानाही येथे केवळ डॉक्टरांच्या अनास्थेमुळे प्रसूती , सिझर होत नाहीत . अचानकपणे दाखल झालेल्या गर्भवती महिलांना सेवा देण्याचे टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून गर्भवती महिलांना प्रसूती , सिझरसाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाला जा ... अशी चिठ्ठी देऊन मार्गी लावले जात असल्याचे चित्र दिसत आहे .

Post a Comment

0 Comments