google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयामध्ये संत रोहिदास महाराज यांना अभिवादन

Breaking News

विज्ञान महाविद्यालयामध्ये संत रोहिदास महाराज यांना अभिवादन

 विज्ञान महाविद्यालयामध्ये संत रोहिदास महाराज यांना अभिवादन


            विज्ञान महाविद्यालयामध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ फुले, उपप्राचार्य विजय कुमार घाडगे समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत रोहिदास महाराज यांचे विचार व्यक्त करताना महाविद्यालयाचे 


प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ फुले यांनी स्पष्ट केले की संत रोहिदास महाराज हे आपल्या कामाशी व कर्तव्याशी एकनिष्ठ होते. आपल्या वाट्याला आलेले व वडिलांनी दिलेले काम ते अत्यंत एकरुपतेने व एक निष्ठेने करत होते. आपल्या कामावर नितांत प्रेम करणारे व अध्यात्मिक विचार आत्मसात करणारे संत रोहिदास हे आपल्या चर्मकार समाजाच्या दुःखाला, वेदनेला वाचा फोडणारे होते. 


आपल्या साहित्यातून विचारातून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी केली. व्यवस्थेशी संघर्ष करत असताना वेळ प्रसंगी त्यांना आपल्या घराचा ही त्याग करावा लागला परंतु समाजामध्ये असलेले शोषण यांच्या  विरोधात ते आवाज उठवत राहिले म्हणून संत रोहिदास यांच्यासारख्या दुर्लक्षित राहिलेल्या संतांचे विचार आज विद्यार्थ्यांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. 


संत रोहिदास महाराज यांचे विचार समाजापर्यंत पोचविणे ्हणजेच खर्‍या अर्थाने त्यांना अभिवादन केल्यासारखे आहे असे स्पष्ट केले. उपप्राचार्य प्रा .विजय कुमार घाडगे यांनी संत रोहिदास महाराज यांचे शोषितांच्या विषयी असलेले विचार स्पष्ट करून त्यांचे चरित्र आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. व दुर्लक्षित असलेल्या संतांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याची तळमळ व्यक्त केली.


          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ किसन माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक वाकडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला.

Post a Comment

0 Comments