सांगोला-पंढरपूर रोडवरील फॅबटेक कॉलेज जवळ कार-दुचाकीचा आपघात ; १ महिला मयत तर दोघे जखमी
सांगोला-पंढरपूर रोड फॅबटेक कॉलेजच्या समोर दुचाकी मोटार सायकल ने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिल्याने १ महिला गंभीर जखमी होऊन मयत झाली आहे .
तर इतर २ जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३;१५ वा. च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील फॅबटेक कॉलेज समोर घडली आहे .
या अपघातात अनिता जगन्नाथ जाधव ह्या अपघातानंतर जबर जखमी होवून मयत झाल्या आहेत. व वर्षा सुनिल घायाळ आणि जगन्नाथ मारुती जाधव हे दोघेजण जखमी झाले आहेत.
विशाल माने रा. दहिगाव ता. माळशिरस हे सांगोला शहरातील पाटील वस्ती येथे कामानिमित्त आले होते. ते एम एच ४५ एन २४९७ या कारमधून गुरुवार दि.४
रोजी दुपारी ३;०० वा.च्या सुमारास सांगोला येथून पंढरपूर च्या दिशेने जात असताना फॅबटेक कॉलेज जवळील असणाऱ्या रेल्वे बोगद्यातून आलेल्या दुचाकी ( एम एच ४५ एजी ८०४१) मोटार सायकलने कारला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील अनिता जाधव ही जखमी होऊन मयत झाली तर जगन्नाथ जाधव व वर्षा घायाळ हे दोघे जखमी झाले आहेत. याबाबत विशाल माने याने पोलिसात खबर दिली आहे.
0 Comments