google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बालविवाह झाला की रद्द होणार सरपंचपद !

Breaking News

बालविवाह झाला की रद्द होणार सरपंचपद !

 बालविवाह झाला की रद्द होणार सरपंचपद !

नंदुरबार : गावात बालविवाह झाला की गावाचे सरपंच आणि सदस्य मंडळींचे पद धोक्यात येणार असून राज्य महिला आयोगाने शिफारशीसह राज्य शासनाकडे तशी मागणी केली आहे.


बालविवाह करण्यास कायद्याने प्रतिबंध असला तरी ग्रामीण भागात सर्रास बालविवाह होताना दिसतात. प्रशासनाला वेळीच माहिती मिळते असे बालविवाह रोखले जातात पण प्रशासनाला भनक लागू नये याची दक्षता घेउन बालविवाह होतच असतात. बऱ्याचदा अशा विवाहाची माहिती गावात असते पण कुणी याबद्दल उघड करीत नाही. गावात अथवा वस्तीवर अत्यंत गुपचूपपणे हे विवाह उरकले जातात. कायद्याने असे विवाह करता येत नाहीत याची माहिती असताना देखील बालविवाह केले जातात. आता मात्र गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य गोत्यात येऊ शकतात. 


गावात होणाऱ्या बालविवाहास ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना जबाबदार धरले जाण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शासनाकडे मोठी मागणी केली आहे. राज्यातील ज्या गावात बालविवाह होइल त्या गावाच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याचे पद रद्द करण्याची मागणी राज्य महिला आयोगाने शिफारशीसह शासनाकडे मागणी केली आहे. 

शासनाने मान्यता दिल्यास सरपंच, सदस्य यांची मोठी कोंडी होणार आहे. गावात होणार असलेल्या बहुतेक बालविवाहाची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधीना आधीच मिळत असते पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. राज्य महिला आयोगाची मागणी मान्य झाल्यास सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना बालविवाहाकडे डोळेझाक करता येणार नाही. 


सरपंच आणि सदस्य यांचे पद रद्द होणार असल्याने त्यांच्याकडून बालविवाह होणार असल्याची माहिती दडवली जाणार नाही आणि आपोआपच बालविवाह टळले जातील. बालविवाह होऊ नयेत म्हणूनच हा तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments