google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील शेकडो एकर सरकारी जागेची विनापरवाना खरेदी-विक्री ; मात्र तलाठी दप्तरात एकही शर्तभंग नोंद नाही !

Breaking News

सांगोला शहरातील शेकडो एकर सरकारी जागेची विनापरवाना खरेदी-विक्री ; मात्र तलाठी दप्तरात एकही शर्तभंग नोंद नाही !

 सांगोला शहरातील शेकडो एकर सरकारी जागेची विनापरवाना खरेदी-विक्री ; मात्र तलाठी दप्तरात एकही शर्तभंग नोंद नाही !

सांगोला (विषेश प्रतिनिधी) ;  सांगोला शहराचे पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तर भागात पाटील, देशपांडे, कुलकर्णी, जात इनाम (डवरी, मुस्लिम) सिलींगच्या शेकडो एकर सरकारी जमीन आहेत. मात्र या सरकारी जमिनीची खरेदी-विक्री करण्यासाठी शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता किंवा कोणत्याही प्रकारचे शासकीय शुल्क न भरता गेल्या ६० वर्षांपासून (१९६०) शेकडो एकर जमीनीचे खरेदी-विक्री चे बेकायदेशीर व्यवहार झालेले आहेत.

सांगोला शहरातील जमिनीचे  एकत्रिकरण न झाल्याने सांगोला शहरातील जमिनीचे गट नंबर पाडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सांगोला शहरातील जमिनीचे ब्रिटीश कालीन सर्वे नंबर आहेत.

सांगोला शहरातील शेकडो एकर जमीनी ह्या सरकारी असल्याची नोंद फक्त कडई पत्रकात आढळून येते. मात्र या शेकडो एकर सरकारी जमिनीच्या नोंदी ७/१२ उता-यावर आढळून येत नाहीत.

७/१२ उता-यावर भोगवटादार - वर्ग - २, नवीन शर्त किंवा सिलींग अशी नोंद गावकामगार तलाठी यांनी घेतली  नसल्याने याचाच फायदा घेवून महसूल विभागाच्या अधिकारी,कर्मचारी यांचेशी संगणमत करून सांगोला शहरातील शेकडो एकर सरकारी जमिनीचे खरेदी-विक्रीचे बिनभोभाटपणे व्यवहार करण्यात आलेले आहेत.

या पैकी काही सरकारी जमिनीची  बिनशेती, गुंठेवारी करण्यात आली आहे. मात्र या परवानग्या देताना देखील सक्षम अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा नजराणा (शुल्क)भरून घेतलेले अढळून येत नाही.

या शिवाय सांगोला नगरपालिकेचे तात्कालीन मुख्याधिकारी यांनी केलेल्या एकूण गुंठेवारी प्रकरणापैकी (इनाम) सरकारी जागेच्या केलेल्या गुंठेवारी प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.

या शिवाय सांगोला नगरपालिकेचे तात्कालीन मुख्याधिकारी यांनी केलेल्या एकूण गुंठेवारी प्रकरणापैकी (इनाम) सरकारी जागेच्या केलेल्या गुंठेवारी प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments