google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ओळखा, यात हिंदू कोण-मुसलमान कोण? 'हिजाब'वरून 'हिंदू-मुस्लिमात' भांडणे लावणारे तुम्ही कोण?

Breaking News

ओळखा, यात हिंदू कोण-मुसलमान कोण? 'हिजाब'वरून 'हिंदू-मुस्लिमात' भांडणे लावणारे तुम्ही कोण?

 ओळखा, यात हिंदू कोण-मुसलमान कोण? 'हिजाब'वरून 'हिंदू-मुस्लिमात' भांडणे लावणारे तुम्ही कोण?



सोलापूर : आश्रय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका रेश्मा मुल्ला यांनी कर्नाटक सरकारच्या हिजाब बंदी विरोधात आक्रमक झाल्या आहेत. सोमवारी त्यांनी मुस्लिम समाजातील लहान मुलांना महापुरुषांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात आणले होते. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष या बालकांनी वेधून घेतले होते.


 ओळखा पाहू यात मुस्लिम समाजातील कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महापुरुषांच्या वेशभूषेतील सर्वच मुस्लीम समाजातील आहेत. आम्ही जर सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत तर हिंदू-मुस्लिम बांधवात धार्मिक भांडणे लावणारे तुम्ही कोण?असा सवाल या मुलांनी कर्नाटक सरकारला उपस्थित केला.....



आश्रय संस्थेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,


उडपी कर्नाटकत येथे हिजाबच्या नावे मुस्लिम विदयार्थीनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक शासनाचा कडक निषेध आहे. कर्नाटक शासनाने मुस्लिम विदयार्थीनींचा हिजाबसारख्या प्रकरणावरुन सामाजिक छळ होणार नाही. येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची हमी घेतली पाहिजे. 


हिजाब घेणाऱ्या फातिमा शेख यांच्या साहयाने डोक्यावर पदर घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात सर्व जातीधर्माच्या मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला. या परंपरेला चूड लावू पाहणाऱ्या समाजविघातक मनुवादी प्रवृत्तींचा कर्नाटक शासनाने कडक बंदोबस्त करावा अशी मागणी करत आहोत. मुस्लिम विदयार्थीनींनी हिजाब घेऊन वर्गात बसणे हा त्यांचा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक अधिकार आहे. 


भाजपशासित कर्नाटक राज्यात समाजात धार्मिक धुव्रीकरण घडवून आणण्यासाठी विदयार्थीनींवर हिजाब बंदी घातली जात आहे. विविध समाजात वेगवेगळ्या धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे. सर्व समभाव करिता एकात्मक संदेशसाठी सर्वांनी एकच भारत घडवून आणणे तरच समानता दर्शवली पाहिजे तरच देशाच भवितव्य उज्वल होतील.


यावेळी उपाध्यक्ष रईसा कांबले, आसिफ शेख, आरिफा शेख,अनिता गोरट्याल यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments